Easy to diagnose Covid 19 by X-ray - Software developed by DIAT,Pune
Easy to diagnose Covid 19 by X-ray - Software developed by DIAT,Pune

कोरोनाचे निदान होणार आता एक्सरेद्वारे; पुण्यातील 'या' कंपनीने तयार केले सॉफ्टवेअर

Published on

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण सुद्धा वाढत आहे. या परिस्थितीमध्ये सर्दी किंवा खोकला हे लक्षणे कोरोनाचे आहेत की इतर कोणत्या आजाराचे याचे विश्‍लेषण आता घरीच करणे अधिक सोपे झाले आहे. पुण्यातील संरक्षण दलाच्या ‘डिफेन्स इन्स्टिटयूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी’ (डीआयएटी) या संस्थेमार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा आधारावर 'सॉफ्टवेअर' विकसित केले आहे. यामुळे छातीच्या एक्सरेच्या मदतीने कोरोना संसर्गाची लागण झाली आहे की नाही हे स्पष्ट होते.

काम देत का कुणी काम : ओझी उचलू, कुठेही राबू पण..

सध्या नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाच्या लक्षणांबाबत मोठे संभ्रम आहेत. यावर उपाय म्हणून या प्रणालीची निर्मिती करण्यात आली असून ‘सी3आयए’ असे या प्रणालीचे नाव आहे. यामध्ये रूग्णाचा छातीचा एक्सरे अपलोड करण्यात येतो. त्यानंतर कोरोना अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या श्वासनाशी संबंधित आजार आहेत की नाही याची माहिती यातून मिळते. 

निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला शाॅक; `एवढे` झाले नुकसान...

या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. यासाठी नागरिकांनी www.diat.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अशी माहिती संस्थे तर्फे देण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'सी3आयए'चे वैशिष्ट्य

- ही यंत्रणा सर्वसामान्य नागरिकांना वापरण्यासाठी मोफत स्वरूपात उपलब्ध 
- यामाध्यमातून रेडिओलॉजिस्टना समस्याचे विश्‍लेषण करून त्यानुसार औषधे सुचविणे सुलभ
- कोणत्याही स्मार्टफोनमध्ये अथवा संगणकावर वापर शक्य
- याच्या माध्यमातून कोरोना चाचणी सोपी
- एक्सरेचे परिक्षण संस्थेच्या तज्ज्ञांकडून केले जाऊन रुग्णांना योग्य सल्ला दिला जातो 
- टेलिमेडिसिनचा लाभ घेणाऱ्या रुग्णांसाठी उपयुक्त


ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com