esakal | कोंढापुरीच्या शासकीय तलावातील पाण्याचे आमदारांच्या हस्ते पूजन
sakal

बोलून बातमी शोधा

 शासकीय तलाव

कोंढापुरीच्या शासकीय तलावातील पाण्याचे आमदारांच्या हस्ते पूजन

sakal_logo
By
नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : चासकमानचे पाणी शिरूर तालुक्याला "हेड टू टेल" देवून सर्वांना समन्याय वाटप करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. पाण्यापासून कोणीही घटक वंचित राहणार नाही याची काळजी प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे. शिरूर तालुक्यातील चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे १०० कोटी रुपये निधीची मागणी केली असल्याची माहिती आमदार ऍड अशोक पवार यांनी सांगितली.

हेही वाचा: चेंबर साफ करीत वाहतुक पोलिसाने पाण्याला करुन दिली मोकळी वाट !

कोंढापुरी (ता. शिरूर) येथील शासकीय तलावातील पाण्याचे पूजन सोमवारी आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. येथील शासकीय तलाव नुकताच चासकमानच्या पाण्याने हाऊसफुल भरल्याने ग्रामस्थांतर्फे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पाणीपूजन करण्यात आले.येथील तलावातील पाण्यावर परिसरातील विविध ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून असून, हजारो हेक्टर शेतीक्षेत्र ओलिताखाली आले आहे. शेतीसाठी विविध गावातील नागरिकांना या पाण्याचा उपयोग होत आहे. येथील तलाव पूर्ण पाण्याने भरल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

हेही वाचा: देशोदेशीच्या गणेशमूर्तीचे पुणेकराने केला संग्रह

दरम्यान, येथील तलावाच्या संपूर्ण कडेला अनावश्यक वेडी वाकडी झाडे झुडपे वाढली असून त्याची दुरुस्ती करण्याची सूचना पाटबंधारे विभागाला आमदार पवार यांनी केली. यावेळी खरेदी- विक्री संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र नरवडे, रांजणगावचे सरपंच सर्जेराव खेडकर, कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, उद्योजक श्रीकांत पाचुंदकर, कोंढापुरीचे सरपंच संदीप डोमाळे, उपसरपंच सुजाता गायकवाड, धनंजय गायकवाड, युवा उद्योजक विनय गायकवाड, अशोक गायकवाड, उमेश दरवडे, नितीन गायकवाड, अमर गायकवाड, पोलीस पाटील राजेश गायकवाड, हिरामण गायकवाड, बबन कोकरे, राहुल दिघे, शांताराम गायकवाड, बाळासाहेब घाडगे, संतोष गायकवाड, राजाराम गायकवाड, महेश फंड, रामदास भुजबळ, अनिल भुजबळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा: हौशी पुणेकराची कमाल, घरातच साकारला मेट्रो प्रकल्पाचा देखावा !

यावेळी कोंढापुरी ग्रामविकास फाउंडेशन व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मल्हार गडावर व गावातील विविध परिसरात वृक्षारोपण व संवर्धन ही चळवळ गेली तीन वर्षापासून सुरू केली असून नागरिकांनी त्यासाठी भरभरून मदत केली आहे निसर्गाचा ठेवा ग्रामस्थांनी संवर्धित करून त्याची जोपासना करावी असे मत आमदार अशोक पवार यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी ग्रामस्थांतर्फे गावच्या समस्याचे निवेदन माजी सरपंच स्वप्निल गायकवाड यांनी दिले. आमदार अशोक पवार यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

loading image
go to top