पुणे : एमएनजीएलचा गॅस पुरवठ्याचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNGL

पुणे : एमएनजीएलचा गॅस पुरवठ्याचा मार्ग मोकळा

पुणे : शहरातील गॅस दाहिनींना व्यावसायिक वापराचे महागडे गॅस सिलेंडर पुरविले जात असल्याने आर्थिक भुर्दंड पडत होता. अखेर दोन वर्षानंतर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)कडून गॅस पुरवठा करण्यासाठी आठवड्याभरात सुरू होणार असून, प्रथम नायडू येथील प्राण्यांच्या दाहिनीसाठी थेट पाइपलाइनमधून गॅस पुरवठा केला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या शहरात विविध भागातील स्मशानभूमीमध्ये १३ गॅस दाहिन्या आहेत. तर नायडू रुग्णालयाच्या परिसरात येथे प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी एक गॅस दाहिनी आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल किंवा विद्युत दाहिनीचा वापर केला जातो. महापालिकेच्या गॅस दाहिनीत एक मनुष्याचे प्रेत जाळण्यासाठी किमान दीड सिलेंडरची आवश्‍यक असते. रोज किमान १५ शव दहन केले जातात. व्यावसायिक सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, सध्या १९ किलोच्या एका सिलेंडरसाठी २२५० रुपये महापालिकेला मोजावे लागत आहेत. तसेच गॅस पुरवठा खंडित होऊ नये यासाठी संबंधित पुरवठादाराकडे गॅसची मागणी करून पाठपुरावा करावा लागतो. सिलेंडरचा गॅस महाग पडत असल्याने दोन वर्षापूर्वी महापालिकेने ‘एमएनजीएल’तर्फे गॅस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. एमएनजीएलतर्फे निवासी दराने गॅस पुरवठा करण्याची तयारी दाखवली होती. पण प्रत्यक्षात हे काम सुरू झालेच नाही.

याबाबत ‘सकाळ’ने फेब्रुवारी महिन्यात वृत्त प्रकाशित करून हे काम अर्धवट असल्याचे समोर आणले होते. त्यानंतर गॅस पुरवठा करण्यासाठी उर्वरित मान्यता घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. नायडू येथील प्राणी दहनाच्या ठिकाणी एमएनजीएलची गॅस पाइपलाइन जोडण्याचे काम केले जाईल. त्यानंतर बिबवेवाडी, वैकुंठ येथील स्मशानभूमित थेट पाइपलाइन द्वारे गॅस उपलब्ध होईल. विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल म्हणाले,‘‘एमजीएनलकडून स्मशानभूमित गॅस पुरवठा करण्यासाठी पाइपलाइन टाकली जाणार आहे. लवकरच हे काम सुरू होईल. ५६ रुपये किलो दराने हा गॅस मिळणार असल्याने महापालिकेची मोठी बचत होणार आहे.

Web Title: Mngl Gas Supply 13 Gas Right In Cemeteries In Pune Municipal Corporation City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top