MNGL Honoring women remarkable work in various fields international women day
MNGL Honoring women remarkable work in various fields international women daySakal

International Women's Day : एमएनजीएलच्या वतीने स्त्री शक्तीचा जागर!

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान

बालेवाडी : येथे महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त , महीला दिनाच्या पूर्वसंध्येला स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना एमएनजीएलच्या वतीने गौरविण्यात आले. यामध्ये महिला रिक्षाचालक, सीएनजी पंपावरील महिला कर्मचारी आणि महिला पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, कमर्शियल डायरेक्टर संजय शर्मा, स्वतंत्र संचालिका बागेश्री मंठाळकर, वरिष्ठ पत्रकार अंजली कामितकर, भागतोय रिक्षावाला संघटनेच्या अध्यक्षा जयश्री अब्राहम यांच्या सह एमएनजीएलचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर यांनी सर्व उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन; महिलांच्या कर्तृत्वाला अभिवादन केले. तसेच एमएनजीएल नेहमीच महिलांना प्रोत्साहन देत असून,

महिला सक्षमीकरणासाठी भविष्यात विविध उपक्रम राबविण्यात येतील, अशी ग्वाही दिली. तसेच, कमर्शियल डायरेक्टर संजय शर्मा यांनी ही महिलांना शुभेच्छा दिल्या.‌ समाजाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन केले.‌

एमएनजीएलच्या वतीने फीलर वुमन ( पंपावर काम करणाऱ्या महीला)आणि महिला रिक्षा चालकांचा सन्मान आणि महिला पत्रकारांचा गौरव हे अतिशय कौतुकास्पद आहे.‌ आज महिलांनी आपल्या प्रामाणिकपणाच्या बळावर समाजात आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

घरकाम करुन महिला जे करुन आपापल्या क्षेत्रात काम करुन घराला हातभार लावतात, ते इतर कोणीही करु शकत नाही. विशेष करुन रिक्षाचालक महिलांकडून समाजाने प्रेरणा घेतली पाहिजे. अन्यायावर आवाज उठवला पाहिजे. महिलांमध्ये प्रचंड ताकद आहे, अशी भावना बागेश्री मंठाळकर यांनी व्यक्त केली.

दरम्यान, वरीष्ठ पत्रकार अंजली कामितकर यांनी सीएनजी पंपावरील मोठी रांग पाहता, महिलांसाठी विशेष रांग असावी अशी भावना व्यक्त केली. त्यावर कमर्शियल डायरेक्टर संजय शर्मा याला सकारात्मक प्रतिसाद देत, संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

यावेळी पुणे पत्रकार संघाच्या खजिनदार अंजली कामितकर, मिलन म्हेत्रे, शुभांगी जाधव, सोनाली संजय, राजश्री अटकरे, अंकिता कोठारे, शीतल बर्गे, मोना एनपुरे यांच्या सह महिला रिक्षाचालक जयश्री अब्राहम, वैशाली रासकर, सोनी शेंडगे, सविता आव्हाड, कामिनी पवार व इतर, सीएनजी पंपावरील वुमन फीलर वैशाली प्रतापे, रेखा लोणकर, काजल कऱ्हाळे, कौसल्या निकम, सुनिता केदारी आणि अनिता पाटील, मनी अम्मा यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com