पुण्यात 'हिरकणी'साठी मनसे सरसावली; चित्रपटगृहाबाहेर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 October 2019

मराठी चित्रपट ट्रिपल सीट व हिरकणी चित्रपटाला थिएटर मिळावे यासाठी मनसे चित्रपट सेनेन आज किबे लक्ष्मी चित्रपटगृहाबाहेर आंदोलन केले. 

पुणे : मराठी चित्रपट ट्रिपल सीट व हिरकणी चित्रपटाला थिएटर मिळावे यासाठी मनसे चित्रपट सेनेन आज किबे लक्ष्मी चित्रपटगृहाबाहेर आंदोलन केले. 

दरम्यान, वेळोवेळी मराठी चित्रपटावर अन्याय केला जातो मराठी चित्रपटाला मल्टिफ्लेक्समध्ये प्राईम शो दिले जात नाहीत त्या तुलनेत मात्र, हिंदी चित्रपटाला सर्व शो दिले जातात, मात्र मराठीवर अन्याय केला जातो त्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

दरम्य़ान, जर मल्टिफ्लेक्समध्ये सिनेमाला योग्य वेळ मिळाली नाही तर राज्यभर आंदोलन होईल अन्यथा जे काही होईल त्याला सरकार जबाबदार असेल असा इशारा देत मनसे चित्रपट सेना आक्रमक झाली आहे. हे आंदोलन रमेश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली झाले निर्माता सागर पाठक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS agitation for Hirakani movie