वाढत्या महागाईविरोधात पुण्यात मनसे आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

सरकारने महागाई कमी करावी अन्यथा रस्त्यावर मनसे स्टाइल आंदोलने करू असा इशारा सरकारला देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अलका टॉकीज चौकात महागाई विरोधात तीव्र निदर्शने केली.

पुणे : दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तू सध्या सरासरी 30 ते 50 टक्‍क्‍यांनी महाग झाल्या आहेत. तर ही महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार मार्फत कोणतीच पाऊले उचलली जात नसून, सरकारमधील प्रमुख मंडळी हा केंद्राचा आणि समित्यांचा विषय आहे. असे म्हणून टोलवाटोलवी करत आहेत.

गौतम पाषाणकर प्रकरणाला वेगळे वळण; बेपत्ता होण्यामागे बड्या राजकीय व्यक्तीचा हात?

दरम्यान, सरकारने महागाई कमी करावी अन्यथा रस्त्यावर मनसे स्टाइल आंदोलने करू असा इशारा सरकारला देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अलका टॉकीज चौकात महागाई विरोधात तीव्र निदर्शने केली.

आंदोलनात पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे, उपशहर अध्यक्ष हेमंत बत्ते, प्रल्हाद गवळी, राम बोरकर, विभाग अध्यक्ष सुनील कदम, सुधीर धावडे, प्रशांत मते, आशिष देवधर, वाहतूक पुणे शहर अध्यक्ष किशोर चिंतामणी, विभाग सचिव रमेश जाधव, आकाश धोत्रे, अभिषेक थिटे प्रभाग अध्यक्ष मनोज ठोकळ, महेश शिर्के, लक्ष्मण काते, कुलदीप घोडके, योगेश महिंद्रकर, बाळासाहेब शिंगाडे, श्‍याम ताठे, सचिन काटकर, प्रवीण मिसाळ, उदय गडकरी, अभिषेक येनपुरे, जेमा चव्हाण, विनोद गायकवाड, राहुल कदम, पिंटू रसाळ, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या कोणतीही भाजी 120 रुपये किलो तर कांदा 80 ते 100 रुपये इतका महाग झाला आहे. तेल सरासरी 30 ते 40 रु. ने तर डाळी आणि कडधान्ये सुद्धा अशाच पद्धतीने महाग झाले आहेत. या महागाईत सामान्य लोकांनी जगायचं कसं? यासाठी सरकारने त्वरित पाऊल उचलावेत अन्यथा आम्ही आंदोलने करू असे, शिंदे यांनी यावेळी सांगितले.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS agitation in Pune against rising inflation