Youth and Women Show Strong Interest in MNS Candidature
sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरविण्यासाठी आज (ता. १९) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शहर कार्यालयात पार पडल्या. यावेळी तरुण उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली असून, पक्षाकडून त्यांचा संपर्क, संघटना बांधणी, शिक्षण याची पडताळणी करून उमेदवारी जाहीर केली जाणार आहे. सुमारे ५०० जणांच्या मुलाखती आज दिवसभरात पार पडल्या.