Vidhan Sabha 2019 : मनसेच्या किशोर शिंदेंचे कोथरूडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन

विनायक बेदरकर
Friday, 4 October 2019

शिंदे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिंबा दिला असल्याने कोथरूडमध्ये शिंदे विरोधकांचा सर्वमान्य उमेदवार ठरले.

कोथरूड (पुणे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिंबा दिला असल्याने कोथरूडमध्ये शिंदे विरोधकांचा सर्वमान्य उमेदवार ठरले.

शुक्रवारी सकाळी शास्त्रीनगर येथील संगम चौकातून दुचाकी वर रॅली गाडीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढत शिंदे यांनी आपला उमेदवार आहे उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मनसेचे गणेश सातपुते राम बोरकर सुधीर धावडे मंदार बलकवडे विनोद मोहिते आधी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांच्या पराभवासाठी विरोधक एकवटले

गेल्या काही दिवसांपासून कोथरूड भागांमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात विरोधकांचा सर्वमान्य उमेदवार कोण अशी चर्चा रंगली होती यावर आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर पाठिंबा देत किशोर शिंदे युतीचे सर्वमान्य उमेदवार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे आणि कॉग्रेसचे नेते अभय छाजेड यांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे कोथरूड मधील निवडणुकीच्या लढतीत चंद्रकांत पाटील विरुद्ध किशोर शिंदे अशी थेट लढत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS candidate Kishor Shinde filed nomination form against Chandrakant Patil from Kothrud assembly constituency