Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांच्या पराभवासाठी विरोधक एकवटले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

कोथरूडमध्ये भाजप- शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि शिंदे यांच्यात सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. तर, ब्राह्मण महासंघाने या बाबत योग्य निर्णय घेऊ असे म्हटले आहे. 

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला असला तरी, छाननीनंतर अंतिम निर्णय होणार आहे. हा निर्णय झाला तर, त्यामुळे कोथरूडमध्ये भाजप- शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि शिंदे यांच्यात सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. तर, ब्राह्मण महासंघाने या बाबत योग्य निर्णय घेऊ असे म्हटले आहे. 

Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांविरुद्ध काँग्रेस आघाडी घेणार मोठा निर्णय!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उमेदवारीला कोथरूडमध्ये सुरवातीला विरोध झाला होता. या पार्श्‍वभूमीवर पाटील यांच्यासमोर एकच समर्थ उमेदवार द्यावा, असा विरोधी पक्षांचा प्रयत्न सुरू होता. त्यानुसार कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड तर, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांनी शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. तर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही बारामतीमध्ये बोलताना किशोर शिंदे यांना छाननीनंतर पाठिंबा देऊ, असे म्हटले आहे.

Vidhan Sabha 2019 : पिंपरीत गोंधळ, राष्ट्रवादीने दिले दोन उमेदवारांना एबी फॉर्म

कोथरूडमध्ये मनसेची व्होट बॅंक आहे. 2009 आणि 2014 मध्ये त्यांच्या उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली होती. त्यावेळी शिंदेच उमेदवार होते. तसेच यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोथरूडची जागा मित्रपक्षाला देण्याची घोषणा केली आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून कोथरूडमध्ये विरोधी पक्षांचा एकमेव उमेदवार असावा, असा प्रयत्न सुरू होता. त्यानुसार आता विरोधी पक्षांची पावले पडू लागली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress and NCP support MNS candidate kishor Shinde Against Chandrakant Patil in Kothrud assembly constituency