Vidhan Sabha 2019 : पुण्यात राज ठाकरेंना सभेसाठी मैदान मिळेना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 October 2019

पुण्यात बुधवारी (ता. ९) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. पण, कोठे हा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार उभे केले नव्हते. परंतु, राज ठाकरे यांनी राज्यभरात तडाखेबंद भाषणाने नागरिकांची गर्दी खेचली होती.

विधानसभा 2019 
पुणे -  विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा शुभारंभ शहरात राज ठाकरे यांच्या जाहीर सभेने होणार आहे. मात्र, अद्याप त्यांची सभा कोणत्या  मैदानावर हे निश्चित नाही. राज ठाकरेंना पुण्यात सभेसाठी मैदान मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्यात बुधवारी (ता. ९) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. पण, कोठे हा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार उभे केले नव्हते. परंतु, राज ठाकरे यांनी राज्यभरात तडाखेबंद भाषणाने नागरिकांची गर्दी खेचली होती. या सभांमधून त्यांनी जनतेसमोर व्हिडिओच्या माध्यमातून परिस्थिती मांडली होती. ‘लावरे तो व्हिडिओ’ हा डॉयलॉगही चांगलाच गाजला होता. आता विधानसभा निवडणुकीत मनसे मैदानात उतरली आहे. त्यामुळे आता जाहीर सभेत राज कोणती भूमिका मांडतात, याकडे जनतेचे लक्ष आहे.

मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले, ‘‘राज यांची पुण्यात बुधवारी जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी टिळक रस्ता आणि शनिवार पेठेतील रमणबाग शाळेकडे मागणी केली होती. परंतु, परवानगी मिळाली नाही.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS chief Raj Thackeray rally in Pune on Wednesday