राष्ट्रवादी आणि काँग्रेसबद्दल काही बोलायलाच नको : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 डिसेंबर 2019

भाजप व शिवसेनेने महाराष्ट्रातल्या मतदारांशी प्रतारणा केली. या नव्या सत्तासमीकरणांमुळे जनतेत नाराजी आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.  

पुणे : विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रात जे काही घडले, तो म्हणजे मतदारांचा अपमान होता. भाजप व शिवसेनेने महाराष्ट्रातल्या मतदारांशी प्रतारणा केली. या नव्या सत्तासमीकरणांमुळे जनतेत नाराजी आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.  

अमित शहा तुमचे अभिनंदन, तुम्ही यशस्वी ठरला : राज ठाकरे

विधानसभेच्या निकालात एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे, निवडणूकीपूर्वी ज्यांनी पक्षांतरे केली, त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. भाजप-शिवसेनेला जनतेने बहुमत दिलं, पण त्यांनी जनतेशी प्रतारणा केली. काँग्रेस, राष्ट्रवादीबद्दल बोलायलाच नको, असा टोलाही राज यांनी यावेळी लगावला. 

शरद पवारांच्या पावसातील सभेपूर्वी कोणीही त्यांच्याबद्दल बोलले नाही. तसेच फडणवीस सत्ता स्थापन करू शकले नाही त्यानंतर त्यांच्याबद्दल कोणीही बोलले नाही, यावरून कळतं की, 'यशाला बाप खूप असताता, पराभवाला सल्लागार खूप असतात.' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपला देश म्हणजे काही धर्मशाळा नाही 
पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचे शिबिर घेतल्यानंतर आज (शनिवार) राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर वक्तव्य केले. नागरिकत्व कायद्यावरून देशभर आगडोंब उसळला असून, हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारने मुळ मुद्द्यांवरून लक्ष हटविण्यासाठी असले कायदे आणले जात आहेत. आपला देश धर्मशाळा नाही, असे राज यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Chief Raj Thackeray speaks about Maharashtra Politics