esakal | अमित शहा तुमचे अभिनंदन, तुम्ही यशस्वी ठरला : राज ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

135 कोटी लोकसंख्या असलेल्या नागरिकांना अजून काही नागरिकांची गरज आहे का? हे आताच कोठून काढले. पिढ्यानपिढ्यांपासून भारतात राहणाऱ्या मुस्लिम नागरिकांनी मोर्चा काढायची गरज नाही. भारत म्हणजे धर्मशाळा नाही. सर्व देशांतील नागरिकांना सामावून घेतले पाहिजे.

अमित शहा तुमचे अभिनंदन, तुम्ही यशस्वी ठरला : राज ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन, तुम्ही आर्थिक मंदीवरून लक्ष हटविण्यात यशस्वी ठरला. देशातील नागरिकांचे विषय आधी मिटवा. नंतर बाहेरच्या नागरिकांना येथे आणा, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचे शिबिर घेतल्यानंतर आज (शनिवार) राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर वक्तव्य केले. नागरिकत्व कायद्यावरून देशभर आगडोंब उसळला असून, हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारने मुळ मुद्द्यांवरून लक्ष हटविण्यासाठी असले कायदे आणले जात आहेत. आपला देश धर्मशाळा नाही, असे राज यांनी म्हटले आहे.

नितीश कुमारही मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात; 'या' कायद्यास नकार

राज ठाकरे म्हणाले, ''135 कोटी लोकसंख्या असलेल्या नागरिकांना अजून काही नागरिकांची गरज आहे का? हे आताच कोठून काढले. पिढ्यानपिढ्यांपासून भारतात राहणाऱ्या मुस्लिम नागरिकांनी मोर्चा काढायची गरज नाही. भारत म्हणजे धर्मशाळा नाही. सर्व देशांतील नागरिकांना सामावून घेतले पाहिजे. माणुसकीचा ठेका फक्त भारताने घेतला नाही. काही गोष्टी सरकारला नियंत्रणात आणाव्या लागतील, नाही तर देश हाताबाहेर जाईल. देशात सीएए, एनआरसीकडे याला वेगवेगळे कंगोरे आहेत. मोर्चे, दंगली होत आहेत. बस जळत आहेत. यातील किती जणांनी किती गोष्टी समजून घेतल्या. मी अमित शहा यांचे अभिनंदन करतो. देशात आर्थिक मंदीवरून लक्ष हटविण्याचे काम त्यांनी केले. त्यासाठी हाच खटाटोप दिसतो. या कायद्यात गोंधळ आहे. नागरिकत्व सिद्ध करायचे आहे. आधारने मतदार मतदान करू शकतो, पण आधार नागरिकत्व सिद्ध करू शकत नाही.  मग बोटाचे ठसे कशाला घेतले.''

Video : अन् पोलिसांनी चक्क आंदोलकांसह गायले राष्ट्रगीत!