राज ठाकरे यांना ग्रासले 'या' आजाराने; उपचार सुरू

mns chief raj thackeray suffering from tennis elbowq
mns chief raj thackeray suffering from tennis elbowq

पुणे : मनसे नेते राज ठाकरे यांच्या उजव्या हाताला गंभीर आजाराने ग्रासले असून, राज ठाकरेंना टेनिस एल्बो हा आजार झाला आहे. आज पुण्यातील एका खासगी कार्यक्रमला राज ठाकरे आले होते. कटारिया शाळेतील मैदानावर त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या वेळी त्यांच्या हाताला बँडेज लागलेलं पाहायला मिळालं. 

गेल्या आठवड्यापासून राज ठाकरे यांच्या हाताला टेनिस एल्बो या आजाराने ग्रासले आहे. टेनिस एल्बो या आजार हाताच्या कोपराला होत असतो. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे काहीकाळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. 

राज ठाकरे यांच्यावर मुंबईत उपचार सुरु आहेत. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते तेव्हा ही त्यांच्या हातातच बँडेज दिसत होतं. त्यांनी अयोध्या निकालावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की अयोध्या केस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अतिशय आनंद झाला. या निर्णयाचे स्वागत करतो, एक धाडसी निर्णय घेतल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन करतो. आता लवकरात लवकर राम मंदीर बांधावे आणि सरकारने देशात रामराज्य आणावे. 

टेनिस एल्बो म्हणजे काय?
आपल्या कोपरापासून महत्त्वाचे स्नायू दंडाच्या दिशेने गेलेले असतात. स्नायूंचा एक संच मनगट उचलण्याचं काम करत असतो. स्नायूंचा उगम कोपराच्या बाह्य दिशेला असतो. हा स्नायूंचा संच उगमस्थानी सुजला तर मनगट उचलण्यासाठी जराशीही हालचाल करणं वेदना देणारं ठरतं. कपडे पिळणं, दरवाजा उघडणं किंवा दरवाजाचा नॉब फिरवणं या साध्या हालचालींमध्येही वेदना होता. कधी-कधी साध्या हस्तांदोलनामुळेही कळ येऊ शकते. टेनिस किंवा बॅडमिंटन खेळ सातत्याने खेळणाऱ्यांना हा त्रास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. याच त्रासाला टेनिस एल्बो असं म्हणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com