Vidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये येणार 'राज वादळ'!

विनायक बेदरकर
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड मतदारसंघात मनसे उमेदवारासाठी दोन प्रचारसभा घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

कोथरूड : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड मतदारसंघात मनसे उमेदवारासाठी दोन प्रचारसभा घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड मतदारसंघ हा भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जात आहे. त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूड मतदारसंघाची निवड केली आहे. पण त्यांच्या मनसुब्याला सुरुंग लावण्याचे काम मनसेने हाती घेतले आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोथरूड मतदारसंघात प्रचार सभा घेऊन चंद्रकांत पाटील त्यांच्याविरोधात मनसेचा उमेदवार किशोर शिंदे यांना विजय करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

Vidhan Sabha 2019 : भाजप विधानसभा जिंकणार?; मोदींसह अनेक दिग्गज स्टार प्रचारक! 

काँग्रेस-राष्ट्रवादीने मनसेला कोथरूड मतदारसंघात जाहीर पाठिंबा दिल्यामुळे चंद्रकांत पाटील आणि किशोर शिंदे यांच्यामध्ये थेट सामना रंगणार आहे. यातच राज ठाकरे यांनीही कोथरूड मतदारसंघासाठी वेळ देण्याचे ठरवल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे.

Vidhan Sabha 2019 : खडसे म्हणतात, 'पक्षाने चांगला निर्णय घेतला'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Chief Raj Thackeray will make Election Campaign for Kothrud Maharashtra Vidhan Sabha 2019