esakal | Vidhan Sabha 2019 : खडसे म्हणतात, 'पक्षाने चांगला निर्णय घेतला'
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 : खडसे म्हणतात, 'पक्षाने चांगला निर्णय घेतला'

- पक्षाने चांगला निर्णय घेतला

- रोहिणी खडसेंना निवडून द्या

Vidhan Sabha 2019 : खडसे म्हणतात, 'पक्षाने चांगला निर्णय घेतला'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर झाली. त्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र, त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांची नाराजी काही प्रमाणात कमी झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच घरात अडचण येते, पक्षाचा विषय तर फार मोठा आहे. उशिरा का होईना पक्षाने चांगला निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.

भाजपकडून आत्तापर्यंत चौथ्यांदा उमेदवार यादी जाहीर झाली. आज झालेली उमेदवारी यादी ही शेवटची यादी होती. मात्र, यामध्येही खडसे यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर आता खडसे यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, 40 वर्षांपासून पक्षाचं काम निष्ठेने केलं. पक्ष बदनाम होईल असं काही केलं नाही. निर्णय कटू असले तरी स्वीकारत आलो आहे. नवीन उमेदवाराला पक्षाने संधी दिली. पक्षाने जो आदेश दिला तो मी मान्य केला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

Vidhan Sabha 2019 : भाजप विधानसभा जिंकणार?; मोदींसह अनेक दिग्गज स्टार प्रचारक!

रोहिणी खडसेंना निवडून द्या

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी रोहिणी खडसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. रोहिणी खडसे या युवा आहेत. काम करण्याचा अनुभव आहे. मतदार संघात परिचित आहे. त्यामुळे आता त्यांना सहकार्य करा, त्यांना निवडून द्या, असे आवाहनही एकनाथ खडसे यांनी केले. भाजपच्या माध्यमातून केलेले काम लक्षात घेत, भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम करायचं आहे. 

Vidhan Sabha 2019 : खडसे, तावडे यांचं अखेर ठरलं! भाजपने घेतला 'हा' निर्णय

पक्षाने चांगला निर्णय घेतला

घरात अडचण येते, पक्षाचा विषय तर फार मोठा आहे. उशिरा का होईना पक्षाने चांगला निर्णय घेतला. पक्षाच्या निर्णयाचा मी स्वागत करतो. निर्णय कटू असले तरी स्वीकारत आलो. पक्ष बदनाम होईल अशी कामं केली नाहीत. तसेच कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवल्या, याची दखल पक्षाने घेतली.

Vidhan Sabha 2019 : एकनाथ खडसे उद्या घेणार महत्त्वाचा निर्णय?

loading image
go to top