...म्हणून चंद्रकांत पाटील यांच्यावर होणार गुन्हा दाखल?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 November 2019

- विश्रांतवाडी पोलिसांकडे करण्यात आली तक्रार. 

पुणे : विधानसभा निवडणुकीची आचारंसहिता सुरू असताना कोथरुड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी महिलांना एक लाख साड्या वाटपाची घोषणा केली. त्यापैकी दहा हजार साड्यांची वाटप केली. या प्रकारामुळे पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विश्रांतवाडी पोलिसांकडे केली आहे. 

मनसेचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्यावतीने प्रभाग क्रमांक एकचे अध्यक्ष गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्टमंडळाने आपले निवेदन विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्याकडे दिले. यावेळी हेमंत बत्ते, सुनील कदम, किशोर चिंतामणी, निखिल पवार, बाळासाहेब शिंगाडे, वंदना साळवी, योगेश महिंद्रकर, दत्ता माळी, सुनील कदम, सनी पंजाबी, कुलदीप घोडके आदी उपस्थित होते. 

...असा धरणाच्या पाण्यात बिबट्या आला वाहून

पाटील यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करावी व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य मुख्य सचिव व मुख्य निवडणुक अधिकारी व पोलिस आयुक्तांनाही याबाबतचे निवेदन पाठविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Party demanding to register FIR against Chandrakant Patil