esakal | एकनाथ खडसे केव्हा सीडी लावताहेत याची वाट पाहतोय- राज ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

raj thackeray eknath khadse

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यात पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्धाटन केले. राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केलं.

एकनाथ खडसे केव्हा सीडी लावताहेत याची वाट पाहतोय- राज ठाकरे

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यात पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्धाटन केले. राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केलं. एकनाथ खडसे केव्हा सीडी लावताहेत याची वाट पाहतोय, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी यावेळी केली. नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता, पण त्यांचा फोन लागला नाही, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यांचा आणि त्यांच्या मुलाचाही फोन लागला नाही, असं ते म्हणाले. भाजप नेते नारायण राणे यांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे. (mns raj thackeray said about narayan rane and eknath khadse)

भाजप नेते नारायण राणे यांची केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून वर्णी लागली. यावेळी त्यांना पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या का? असा सवाल केला होता. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला फोन करुन शुभेच्छा दिल्या, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत. शुभेच्छा देण्याइतकं त्यांचं मन मोठं नाही. याच मुद्द्यावरुन राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी सांगितलं की, मी नारायण राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता, पण त्यांचा फोन लागला नाही. दोन-तीन दिवसांत फोन लागल्यास मी शुभेच्छा देईन.

हेही वाचा: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंचा टोला; म्हणाले...

एकनाथ खडसेंवर भाष्य

सध्या सरकारी यंत्रणाच्या सुरु असलेल्या कारवाईबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं. मी एकनाथ खडसे केव्हा सीडी लावताहेत याची वाट पाहतोय. एकनाथ खडसे म्हणाले होते माझ्यामागे इडी लावली तर मी तुमची सीडी लावेन. खडसे ही सीडी केव्हा लावताहेत याची मी वाट पाहतोय, असं ते म्हणाले.

हेही वाचा: नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर बोलणार नाही- शरद पवार

सरकारी यंत्रणाचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातोय हे स्पष्ट आहे. काँग्रेस पक्षाचं सरकार असताना या यंत्रणांचा असाच वापर केला गेला, भाजपचं सरकार असतानाही या यंत्रणांचा असाच वापर केला जात आहे. यंत्रणा ही कुणाच्या हातातली बाहुली नाही. एखाच्या व्यक्तीच्या विरोधात असं यंत्रणांचा वापर करणे चुकीचं आहे. ज्यांनी खरंच गुन्हे केलेत ते मोकाट सुटले आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांवर अशा गोष्टी लादत असाल तर ते चुकीचं आहे, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

loading image