esakal | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंचा नेत्यांना टोला; म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Raj-Thackeray

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंचा टोला; म्हणाले...

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

पुणे- पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय पक्षांना टोला लगावला. मराठा आरक्षणाच्या वेळेला मुंबईत एक मोर्चा निघाला होता. या मोर्चाला सर्व पक्षातील नेत्यांनी उपस्थिती लावली होती. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सर्व नेते या मोर्चाला गेले होते. मला प्रश्न पडतो मराठा आरक्षण सर्वांना मान्य आहे, मग नेमकं अडलंय कुठं. मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकवणे इतकाच नेत्यांचा उद्देश आहे का? ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही सर्वांना मान्य आहे. ते रद्द केलं गेलंय. केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही सरकारांना मान्य आहेत, तर अडतंय कुठं. कोर्टामध्ये तुमची बाजू प्रभावीपणे मांडली का जात नाहीये? सर्वांना एकदा व्यासपीठावर आणा, त्यांना विचारा तुम्हा सर्वांना हे मान्य आहे का? असं ठाकरे म्हणाले.

सध्या कळत नाहीये की कोण कुणाचा शत्रू आहे अन् कोण कुणाचा मित्र. नेते आज काय बोलतील आणि उद्या काय बोलतील हे सांगता येत नाही, असं राज ठाकरे म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी 'एकला चलो'चा नारा दिला होता. तसेच पाठीत खंजीर खुपसण्यात आल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना राज ठाकरे यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: पर्यटनस्थळांवरील गर्दीला आवरा, केंद्राच्या राज्यांना सूचना

मराठा आरक्षणावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांवर ढकला-ढकली करत आहे. हे लोकांनी पाहणं गरजेचं आहे. राजकीय नेत्यांना या प्रश्नांनी उत्तरं विचारली गेली पाहिजे. तुम्हा सर्वांचे या मुद्द्यावर एकमत आहे, तर मग नेमकं घोडं पेंड कुठं खातंय. नेते केवळ मतदानासाठी लोकांकडे जातात आणि निवडणूक झालं की तोंड फिरवलं जातं, असा करुन चालणार नाही. लोकांनी राजकीय नेत्यांना जाब विचारायला हवा. केवळ लोकांची माथी भडकवण्याचा तुमचा उद्देश आहे का? असा खरमरीत सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

loading image