Maharashtra Politics |त्यांचं फुकटचं खाणं बंद करा; राज ठाकरेंच्या पत्नी महागाईवरुन भडकल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharmila Thackeray
त्यांचं फुकटचं खाणं बंद करा; राज ठाकरेंच्या पत्नी महागाईवरुन भडकल्या

त्यांचं फुकटचं खाणं बंद करा; राज ठाकरेंच्या पत्नी महागाईवरुन भडकल्या

राज्यात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून अमित ठाकरेही राज्यभर दौरे करत आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेही आता आक्रमक झालेल्या दिसून आल्या. महागाईच्या मुद्द्यावरुन त्यांनी केंद्रीय मंत्र्यांवर टीका केली आहे. (Sharmila Thackeray MNS)

हेही वाचा: शिवसेना-मनसे युतीसंदर्भात शर्मिला ठाकरेंच्या विधानावर सेनेची प्रतिक्रिया; म्हटले..

पुण्यातल्या एका कार्यक्रमाला राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) पत्नी शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. शिवसेना कोणाची, उद्धव राज एकत्र येणार का, अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी टीकाटिप्पण्या केल्या. देशभरातल्या महागाईच्या मुद्द्यावरुन त्यांनी केंद्रीय मंत्र्यांवर टीकाही केली आहे.

हेही वाचा: Video: शिवसेना कुणाची? शिवसेना संपली? यावर शर्मिला ठाकरे म्हणतात...

देशात वाढलेल्या महागाईवरुन त्यांनी केंद्रीय मंत्र्यांवर टीका केली आहे. शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, त्यांना जे कँटीनमध्ये तिथे फ्री मिळतं ते आधी बंद करा. जेव्हा विकत घेऊन खायला लागेल तेव्हा कळेल महागाई वाढलीय की नाही ते. गॅसपासून तुरडाळीपासून, भाज्यांपर्यंत म्हणजे शाकाहारी लोकांचं ताटही आता महाग झालंय.

Web Title: Mns Raj Thackeray Wife Sharmila Thackeray On Inflation In India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..