
MNS : मनसेची पुण्यातील सभा रद्द; राज ठाकरे मुंबईकडे रवाना
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुण्यात होणारी सभा रद्द झाली आहे. पावसाचं कारण देत ही सभा रद्द करण्यात आली असल्याचं सुत्रांकडून कळतंय. मनसेकडून डेक्कन पोलिसांना सभा रद्द झाल्याचं पत्र देण्यात आलेलं आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले आहेत. (MNS rally in Pune canceled MNS president Raj Thackeray leaves for Mumbai)
राज ठाकरेंनी ५ जून रोजी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यापूर्वी पुण्यात सभा घेऊन रणशिंग ते फुंकणार असल्याचं बोललं जात होतं. डेक्कन भागातील भिडे पुलाजवळील नदी पात्रात ही सभा घेणार असल्याचं मनसेकडून जाहीरही करण्यात आलं होतं. कार्यकर्त्यांनी या सभेसाठी तयारीही सुरु केली होती.
दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या सभेला कोणतीही अडचण नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, याबाबत सर्व परिस्थिती पाहून पुणे पोलीस आयुक्त अंतिम परवानगी देतील असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, पोलिसांकडून सभास्थळाची पाहणीही करण्यात आली होती.
पण आता हवामान खात्यानं २१ मे रोजी पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे, याचं कारण देत मनसेकडून आज अचानक ही सभा रद्द झाल्याचं पत्र पोलिसांना देण्यात आलं आहे.
Web Title: Mns Rally In Pune Canceled Mns President Raj Thackeray Leaves For Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..