उगाचंच भीतीने पोटात गोळा आला होता...; वसंत मोरेंची भावनिक पोस्ट

वसंत मोरे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली आहे.
Vasant More
Vasant MoreSakal

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी केलेल्या मशिदीवरील भोंग्याच्या वक्तव्यावरुन वाद पेटला होता. या वक्तव्यावर पुण्याचे मनसे अध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना पुण्याच्या मनसे शहराध्यक्ष पदावरुन काढण्यात आलं होत. त्यानंतर त्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली आहे. भेटीनंतर त्यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

आज सकाळी साधारण ११ वाजण्याच्या सुमारास वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या भेटीच्या अगोदर त्यांनी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी सगळ्या पक्षांच्या ऑफर येथे संपलेल्या आहेत असं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी आता आपल्या फेसबुकवरुन एक भावनिक पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, "आयुष्यात खूप पदे मिळाली, ती कामाच्या आणि एकनिष्ठेच्या जोरावर.. पद काय आज आहे तर उद्या नाही हो... पण माझं जे "माझा वसंत" हे स्थान काही काळासाठी डळमळीत झालं होतं, ते तिथं (शिवतीर्थावर) गेल्यावर कळलं की मी तर काहीच हरवलेलं नाही." असं म्हणत त्यांनी आपली कृतज्ञता आणि पक्षांबद्दलचा आदर व्यक्त केला आहे. पुढं ते लिहितात की, उगाचंच भितीने पोटात गोळा आला होता म्हणूनच मी म्हणतो मी आपला इथंच बरा... असं बोलत त्यांनी आपली भूमिका व्यक्त करत पक्ष आणि राज ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे.

Vasant More
गुजरातमध्ये कंपनीत स्फोट; ६ कामगारांचा मृत्यू

दरम्यान राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या वक्तव्यावर ते सहमत नसल्याचं बोलल्यामुळे त्यांच्याकडील पुणे मनसे शहराध्यक्षपद काढून साईनाथ बाबर यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणानंतर त्यांना बऱ्याच पक्षांकडून आपल्या पक्षात येण्यासाठी ऑफर आल्या होत्या. पण आजच्या भेटीनंतर वसंत मोरे मनसे सोडणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com