

Forest Fires in Moakhada Hills
Sakal
मोखाडा : जंगलातील वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी काही समाजकंटक मोखाड्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वतवड्या डोंगर परिसरात रात्रीच्या वेळेस वणवे पेटवले जात आहेत. या घटनांमुळे वन्यजीवांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून मौल्यवान वनौषधी नष्ट होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सदरच्या घटनांमुळे संपूर्ण पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.