पुण्यात भांडणे सोडविल्याच्या रागातून टोळक्‍याकडून तरुणावर कोयत्याने वार

पुण्यात भांडणे सोडविल्याच्या रागातून टोळक्‍याकडून तरुणावर कोयत्याने वार

पुणे ः भांडणे सोडविल्याच्या रागातुन टोळक्‍याने एका तरुणावर कोयत्याने वार करीत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर आरोपींनी तलवार व कोयते हवेत फिरवून नागरीकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री पावणे बारा वाजता विमाननगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली.

तुषार राजु बनसोडे (वय 18, रा. यमुनानगर, विमाननगर), महेश बलभिम सरोदे (वय 21, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), आकाश सुग्रीव घोडेस्वार (वय 31) करण भारत सोनवणे (वय 23, दोघेही रा. निळा झेंडा चौक, लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विशाल कापसे (वय 21, रा. यमुनानगर, विमाननगर) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची करण तुजारे याच्यासमवेत भांडणे झाली होती. त्यावेळी फिर्यादी विशाल कापसे यांनी मध्यस्थी करून त्यांची भांडणे सोडविली होती. तुषार बनसोडे याने त्याच राग मनात ठेवला होता.

दरम्यान, रविवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास तुषार बनसोडे हा त्याच्या साथीदारांना घेऊन फिर्यादीच्या घरासमोर आला. त्याने फिर्यादीकडे पाहत "हा पण होता का ? ' अशी विचारणा करीत फिर्यादीस लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तुषारने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्‍यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादीने हात डोक्‍यावर ठेवून तो वार अडविला, त्यामध्ये फिर्यादीच्या हाताचा पंजा व मनगटावर जबर दुखापत झाली. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी फिर्यादीच्या डोक्‍यात तलवारीने मारले. त्यामध्ये त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर जखम झाली. या घटनेनंतर आरोपींनी संबंधीत परिसरात आपली दहशत निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांच्याकडील तलवारी व कोयते हवेत फिरवून, तेथे जमलेल्या नागरीकांना उद्देशून "कोणी पुढे आले तर एकेकाला ठार मारु' अशी धमकी देत दहशत निर्माण केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एच.एस.गिरी करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com