esakal | बारामतीकरांचा दिवस गेला हॅलो हॅलो मध्येच...
sakal

बोलून बातमी शोधा

mobile.jpg

काही विशिष्ट कंपन्यांच्या मोबाईल नेटवर्कचे आज तीन तेरा वाजल्याने फोन न लागणे, लागले तरी संभाषणच न होणे, परस्परांना आवाजच न जाणे, कॉल मध्येच कट होणे अशा असंख्य प्रकारांना बारामतीकर सामोरे गेले.

बारामतीकरांचा दिवस गेला हॅलो हॅलो मध्येच...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : ....हॅलो...हॅलो...अजून जोरात हॅलो....मग जरा हळूच हॅलो....मग पुन्हा हॅलो हॅलो हॅलो...मग समोरचाही हॅलो हॅलो करतोय...आणि या हॅलो हॅलोतच संवाद संपुष्टात....मग वैतागून पुन्हा कॉल लावायचा आणि पुन्हा हाच खेळ खेळायचा.....आज बारामतीकरांनी मोबाईलच्या कॉल ड्रॉपचा कमालीचा मनस्ताप सहन केला.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही विशिष्ट कंपन्यांच्या मोबाईल नेटवर्कचे आज तीन तेरा वाजल्याने फोन न लागणे, लागले तरी संभाषणच न होणे, परस्परांना आवाजच न जाणे, कॉल मध्येच कट होणे अशा असंख्य प्रकारांना बारामतीकर सामोरे गेले. रेंजमध्ये असूनही नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर असल्याची कॅसेट वाजणे, काहींना तर फोन स्विच ऑफची तर काहींच्या फोनवर या नंबरची इनकमिंग सुविधा बंद आहे अशीही कॅसेट ऐकायला मिळाली. 

पुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच 

तक्रार नेमकी कोणाकडे करायची, त्यात पुन्हा तक्रार करुनही काही फरक पडेल का याची शाश्वती नाही, लॉकडाऊन असल्याने सगळेच बंद करायचे तरी काय या विचाराने अनेकांनी वारंवार फोन लावले किंवा फोनवर बोलण्याचा नादच सोडून दिला. अनेकांचा संवाद पूर्ण होऊ न शकल्याने काही गैरसमजही झाल्याचे किस्से घडले. अनेकांना वैद्यकीय कारणांसाठी तातडीचे फोन करणे गरजेचे होते, त्यांनाही कॉल ड्रॉपचा मनस्ताप सहन करावा लागला.  हा अनुभव अनेकांना वारंवार येत आहे, अनेकदा तक्रारी केल्या जातात, मात्र या बाबत समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. बिल वसूलीसाठी तगादा सेवेबाबत आनंद अशी स्थिती असल्याचे मोबाईलधारकांनी सांगितले.