"मोबाईल दान देगा देवा' : गरीब विद्यार्थ्यांसाठी अनोखी संकल्पना... 

khalad.jpg
khalad.jpg

खळद (पुणे) : मुळातच ऑनलाइन शिक्षणात अनेक अडचणी आहेत. यामध्ये काही पालकांकडे एकच फोन आहे ते दिवसभर कामानिमित्त घराच्या बाहेर असतात. अशा वेळेस विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही. काहीवेळा अनेक भावंडे असल्याने त्यांच्या तासाच्या वेळाही एकच असतात. त्यामुळे एकाच विद्यार्थ्याला मोबाईल मिळतो. ऑनलाइन अभ्यासाची वेळ व पालकांची कामाची वेळ एकच असल्यामुळे मुलांना या वर्गाला मुकावे लागते. मग "नको ते ऑनलाइन शिक्षण' म्हणायची वेळ येते. पण पुरंदर तालुक्‍यातील एका अनोख्या उपक्रमाने या समस्येवर मात केली आहे. 

खळद येथे गोटेमाळ वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेत ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. मुख्याध्यापक विजय वाघमारे व उपशिक्षिका चंद्रकला वाघमारे यांनी "मोबाईल दान' ही संकल्पना राबवून व ती यशस्वी करून एक प्रकारचा आदर्श घालून दिला आहे. सध्या कोरोनाच्या जागतिक आपत्तीत शाळा बंद आहेत, पण शिक्षण थांबले नाही पाहिजे यासाठी सर्व शिक्षक जूनपासून ऑनलाइन शिक्षणाचे धडे देत आहेत. परंतु काही विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड सोडा, पण साधा फोनही नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असा विचार सातत्याने मनात येत होता. आणि याच विचारातून "मोबाईल दान' ही संकल्पना जन्मास आली, असे मुख्याध्यापक विजय वाघमारे यांनी सांगितले. माजी सरपंच छाया कामथे यांनीही या संकल्पनेचे कौतुक केले असून यामुळे शिक्षणात येणाऱ्या अडचणींवर मात करता येईल, असे म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मुख्याध्यापक म्हणतात... 
- फेसबुक व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरावर यासंबंधीचे माहिती देण्यात आली 
- प्रतिसाद देत शाळेसाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नवीन व जुने मोबाईल फोन व टॅबलेट मिळाले 
- शाळा जरी बंद असल्या तरी मुलांशी रोजचा होणारा संवाद शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सुखावणारा असतो 
- फोनमुळे आता शिक्षक विद्यार्थी यांचा रोज एकमेकांशी संपर्क 
- गरीब गरजू मुलांसाठी मोबाईलमध्ये इंटरनेटची मासिक सुविधा मोफत उपलब्ध करून देणार 

 

फेसबुकवरील "मोबाईल दान' ही संकल्पना पाहून लंडनस्थित व पुरंदर आजोळ असणाऱ्या सॉफ्टवेअर अभियंत्या असलेल्या कविता दत्तात्रय पोटे यांनी सहा नवीन अँड्रॉइड फोन पाठवून दिले आहेत. तसेच अजून हवे असल्यास कळवावे, असा अभिप्रायही पाठवला आहे. त्यामुळे आपण जर समाजाकडे गेलो तर नक्कीच आपल्या समाजाची मदत मिळते. 
- चंद्रकला वाघमारे, उपशिक्षिका 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com