

Pune Highway Accident
esakal
लोणी काळभोर : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोबाईलवर बोलत असलेल्या दुचाकीस्वाराच्या निष्काळजीपणामुळे एका ट्रक चालकावर गंभीर संकट ओढवले आहे. रस्ता पायी ओलांडत असताना दुचाकीची धडक बसून खाली पडलेल्या चालकाच्या अंगावरून वाहन गेल्याने त्यांचा पाय चिरडला गेला. या भीषण अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.