खर्गेंच्या निवासस्थानी विरोधकांची ‘मॉक संसद’

खर्गेंच्या निवासस्थानी 
विरोधकांची ‘मॉक संसद’
Published on: 

खर्गेंच्या निवासस्थानी
विरोधकांची ‘मॉक संसद’

मुख्य निवडणूक आयुक्तांवर आरोप

नवी दिल्ली : इंडिया आघाडीतर्फे शनिवारी (ता. ३१) दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात प्रतीकात्मक ‘जनमहाभियोगा’ची कार्यवाही सुरू करण्यात आली.
या वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार निवडणूक आयोग चालवत असल्याचा आरोप केला.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आयोजित या ‘मॉक संसदे’साठी संसदेच्या धर्तीवर सभागृहाची रचना करण्यात आली होती.
खर्गे म्हणाले, ‘‘सात महिन्यांपूर्वी १९३ खासदारांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविण्याचा प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सभागृहांत मांडला होता. मात्र, या खासदारांच्या नोटिसा फेटाळण्यात आल्या. या नोटिसांची दखलही घेण्यात आली नाही. देशात सुरू असलेली ‘मतचोरी’ रोखण्यासाठी येथे उपस्थित झालेले इंडिया आघाडीचे खासदार सज्ज झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी डिसेंबर २०२३ मध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून ज्ञानेश कुमार यांना आजीवन कायदेशीर संरक्षण दिले. देश आणि संविधानाविरोधात ज्ञानेश कुमार यांनी केलेली कथित गुन्हेगारी कृत्ये लपविण्यासाठी हे सर्व करण्यात आले. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांना तातडीने पदावरून हटविले पाहिजे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘आम्ही निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आम्ही सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली. लोकशाही आणि निवडणूक व्यवस्था वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला रस्त्यावरही उतरावे लागले.’’
दरम्यान, एसआयआर प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या विरोधात इंडिया आघाडीतर्फे आज (ता.१)रामलीला मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.