
-विजय सुराणा
तळेगाव दाभाडे : यापूर्वी शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय करणे यासारख्या तरुणांना आयुष्यात महत्त्वाच्या परीक्षा द्यावा लागायच्या. मात्र या परीक्षांबरोबरच आता युवकांना लग्न जमविण्यासाठीही अग्निपरीक्षा द्यावी लागत आहे. आयुष्याचा जोडीदार निवडण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांना अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे. विवाह बंधनाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तिशी ओलांडलेल्या अनेक युवकांवर भावी सासऱ्याकडे ‘हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या मला’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.