Garjaidevi
sakal
माले - एकोले (ता. मुळशी) येथील घनगड किल्ला येथील गडदेवता असलेल्या श्रीगारजाई देवीच्या स्थापनेचा संबंध थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी असल्याचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुरावा समोर आला आहे. इतिहास संशोधक व मोडी लिपी अभ्यासक राज चंद्रकांत मेमाणे यांना पुणे पुरालेखागारातील घनगडसंबंधी कागदपत्रांमध्ये सापडलेल्या मोडी पत्रातून हा उल्लेख स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.