सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ जवळ अपघात दोघांचा मृत्यू अन्य सात जण जखमी

सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ जवळ अपघात दोघांचा मृत्यू अन्य सात जण जखमी
Published on: 

MOH26B03796 : प्रकाश आगसीमनी
MOH26B03797 : बिराप्पा बिसराळी

रस्त्यावर उभ्या कंटेनरला ट्रॅव्हल्सची धडक; दोघांचा मृत्यू
मोहोळजवळ पहाटे अपघात; सात जण जखमी, कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. ३१ : मोहोळ-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून मिनी ट्रॅव्हल्सची धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. शुक्रवारी (ता. ३१) पहाटे ५.४० वाजण्याच्या सुमारास मोहोळपासून पाच किलोमीटर अंतरावरील चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीजवळ ही घटना घडली. प्रकाश बाळाप्पा आगसीमनी (वय ३६) आणि बिराप्पा शंकराप्पा बिसराळी (वय ४२) अशी मृतांची नावे आहेत.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील तिगारी येथील प्रकाश आगसीमनी आणि त्यांचे मित्र मिनी ट्रॅव्हल्समधून देवदर्शनासाठी शिर्डी येथे गेले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईला भेट दिली. गुरुवारी (ता. ३०) रात्री ते पुणे-सोलापूर महामार्गावरून कर्नाटकातील गावी परतत होते. शुक्रवारी पहाटे चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीजवळ रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून धोकादायकरीत्या उभ्या केलेल्या कंटेनरला त्यांच्या वाहनाची धडक बसली.
या अपघातात प्रकाश आगसीमनी आणि बिराप्पा बिसराळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परशुराम मलप्पा बिसराळी, अनमना गौडा, अनमेष शरणप्पा हचनाळ, गिदप्पा शंकरप्पा आगसीमनी, शिवप्पा श्रीशैलप्पा येनगी, बसवराज तळवार आणि चालक मंजुनाथ उच्चीगम्मा हे सात जण जखमी झाले. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी जखमींना टोल प्लाझाच्या रुग्णवाहिकेतून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
देवेंद्रप्पा सोमप्पा यांच्या फिर्यादीवरून कंटेनरचालक महंमद शेख खालिद (रा. बसवकल्याण, जि. बिदर) याच्याविरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात विभागाचे पोलिस हेड कॉन्स्टेबल अतुल क्षीरसागर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.