युवासेना जिल्हाध्यक्षाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मानसी नाईकसोबत छेडछाड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

अभिनेत्री मानसी नाईक रांजणगावला वाढदिवसाच्या कार्यक्रमला आली असता तिच्यासोबत छेडछाड झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवशी ही छेडछाड झाली असल्याचं मानसीने फिर्यादीत म्हटलं आहे.

पुणे : अभिनेत्री मानसी नाईक रांजणगावला वाढदिवसाच्या कार्यक्रमला आली असता तिच्यासोबत छेडछाड झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवशी ही छेडछाड झाली असल्याचं मानसीने फिर्यादीत म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मानसीने साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री मानसी नाईकशी गैरकृत्य केल्याप्रकरणी मानसी नाईक यांच्याकडून मुंबईतील साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्री मानासी नाईक 5 फेब्रुवारीला शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव येथे संध्याकाळी वाढदिवसाच्या कार्यक्रमात परफॉर्मेंस करत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याच्याशी गैरकृत्य केल्याप्रकरणी मानसी नाईककडून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

तानाजी सावंताच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर संताप

साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपासासाठी रांजणगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. 3 जणांवर 354 आणि 506 प्रमाणे साकीनाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला रांजणगाव येथे कार्यक्रमाच्या स्थळी पाठीमागे येवून दमबाजी करुन विनयभंग केला अशी तक्रार नाईकने पोलिसात दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: molestation of Mansi Naik in Pune File a complaint