पुणे : मनपा रुग्णालयात कोरोना लसीसाठी घेतले पैसे

सुरक्षा रक्षकाने लस घेण्यासाठी आलेल्या एका नागरिकाकडून चारशे रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
corona vaccine
corona vaccinesakal media

वारजे : पुणे महापालिकेच्या (pune corporation) कै. अरविंद गणपतरावं बारटक्के रुग्णालयात सुरक्षा रक्षकाने लस घेण्यासाठी आलेल्या एका नागरिकाकडून चारशे रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तशी कबुली सुरक्षारक्षकाने दिली आहे.

corona vaccine
पुण्यात बसथांबा कोसळला; तीन प्रवासी जखमी

याबाबत इश्मखार हुसेन (वय 36, रा. वारजे माळवाडी) यांनी या प्रकरणी वरिष्ठांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच सुरक्षारक्षकाने लससाठी पैशांची मागणी केल्याचे वरिष्ठांसमोर मान्य केले असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हे सुरक्षा रक्षक गेटवर कमी पण रुग्णालयातील कामात हस्तक्षेप करत असल्याने अशा सुरक्षा रक्षकावर कारवाई करण्याची मागणी किरण बारटक्के यांनी केली आहे.

corona vaccine
खेड : शिवसेनेच्या सदस्यांना ‘व्हीप'

याबाबत महापालिकेच्या सुरक्षा विभागाला माहिती दिली आहे. त्याबाबत संबंधितांनी निर्णय घ्यावा, असे वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय आरोग्य अधिकारी अरुणा तारडे यांनी सांगितले. याप्रकरणी सुरक्षा विभागाचे फिल्ड ऑफिसर योगेश तारू म्हणाले, सदरचा प्रकार निंदणीय असुन सुरक्षारक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com