बनावट संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करून परिक्षार्थींकडून घेतले पैसे

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटी प्रकरणातील आरोपींकडून जप्त करण्यात आलेले मोबाईल, लॅपटॉप, हार्डडिस्क यातून गुन्ह्याच्या अनुषंगाने उपयुक्त माहिती मिळत आहे.
CYBER CRIME
CYBER CRIMESAKAL
Summary

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटी प्रकरणातील आरोपींकडून जप्त करण्यात आलेले मोबाईल, लॅपटॉप, हार्डडिस्क यातून गुन्ह्याच्या अनुषंगाने उपयुक्त माहिती मिळत आहे.

पुणे - शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार (Exam Malpractice) करणाऱ्या आरोपींनी (Accused) आरोग्य भरती परीक्षेत गट 'ड' आणि 'क' पदाच्या पेपर फुटी प्रकरणातील आरोपींशी हातमिळवणी करून टीर्इटीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांचे निकाल (Result) एका बनावट संकेतस्थळावर प्रसिद्ध करून त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.

टीर्इटी प्रकरणातील आरोपी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त नामदेव तुकाराम सुपे (वय ५८, रा. पिंपळे गुरव), शिक्षण विभागात खासगी कंपनीचा तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत असणारा अभिषेक अजय सावरीकर (वय ३१, रा. शिवाजीनगर) आणि आरोग्य भरतीच्या परीक्षा आयोजनाचे कंत्राट असलेला जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. प्रितीश दिलीप देशमुख (रा. चिंचवड) यांच्यासह इतरांनी हे संकेतस्थळ तयार केले होते, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

CYBER CRIME
इंदापूर पोलिसांनी ३२ लाख ६६ हजार ८० रुपयांचा गुटखा जप्त केला

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटी प्रकरणातील आरोपींकडून जप्त करण्यात आलेले मोबाईल, लॅपटॉप, हार्डडिस्क यातून गुन्ह्याच्या अनुषंगाने उपयुक्त माहिती मिळत आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून सुपे आणि सावरीकर यांच्या आणखी साथीदारांची नावे निष्पन्न होत आहे. सावरीकर यास गुन्ह्यातील १ कोटी २५ लाख रुपये मिळाले आहे. या रक्कमेबाबत तो माहिती देत नसल्याचे सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी गुरुवारी (ता. २३) न्यायालयाला सांगितले. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी सुपे आणि सावरीकर यांच्या पोलिस कोठडीमध्ये ३० डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायाधीश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी दिला. सुपे याच्यावतीने ॲड. मिलिंद पवार आणि ॲड. विश्‍वास खराबे तर सावरीकर याच्यावतीने ॲड. हर्षद निंबाळकर आणि ॲड. योगेश पवार यांनी कामकाज पाहिले.

या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रीक डिव्हाईसचा तपास करण्यासाठी, गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या त्यांच्या साथीदारांबाबत तपास करण्यासाठी, सुपे यांनी त्यांच्या नातेवाइकांकडे, ओळखीच्या लोकांकडे काही रक्कम दिली असल्याने त्याबाबत तपास करण्यासाठी तसेच त्यांनी इतर परीक्षांच्या नियोजनामध्ये गैरव्यवहार केला आहे का? याचा तपास सुरू आहे. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सुपे यांच्या कार्यालयातील इतर कोणी साथीदार आहे का?, सदर गुन्हा पूर्वनियोजन करून करण्यात आला असून, यासाठी राज्यातील एजंट, अ‍ॅकॅडमी चालक यांच्यासह इतर कोणी कशा प्रकारे मदत केली? याचा तपास करण्यासाठी दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद अ‍ॅड. जाधव यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com