
Monsoon 2025
Sakal
नवी दिल्ली : यंदा मॉन्सूनने दमदार हजेरी लावली असून, देशात सरासरीपेक्षा आठ टक्के जास्त पाऊस झाल्याचे हवामान खात्यातर्फे आज सांगण्यात आले. मॉन्सूनचा हंगाम संपला असला तरी परतीच्या प्रवासाला यंदा विलंब होणार असून, देशाच्या बहुतांश भागात भागात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे.