
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता. २९) राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियानाचा उर्वरित भाग आणि दिल्लीसह संपूर्ण देश व्यापला आहे. यंदा केरळ आणि महाराष्ट्रात विक्रमी वेगाने दाखल होणाऱ्या मॉन्सूनने सर्वसाधारण वेळेच्या नऊ दिवस आधीच संपूर्ण देश आपल्या अधिपत्याखाली घेतला आहे.