

Monsoon March Continues: Konkan Fully Covered, Vidarbha Joins Rain Map
sakal
पुणे: मॉन्सूनने सलग दुसऱ्या दिवशी प्रगती करत मंगळवारी मुंबईसह संपूर्ण कोकण विभाग व्यापला. दुसरीकडे मराठवाड्याचा बहुतांश भाग व्यापत मोसमी पावसाने विदर्भातही प्रवेश केला. हवामान अनुकूल असल्याने पुढील दोन दिवसांत मॉन्सूनची आणखी प्रगती अपेक्षित असून, येत्या आठवड्यात कोकणात सर्वदूर पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे.