esakal | Video : मॉन्सून कर्नाटकात दाखल; महाराष्ट्रात कधी पोचणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon enter in Caravan at karnataka.jpg

निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला समांतर घोंगावत पुढे गेले. ते अलिबागजवळ जमिनला धडकले. त्यानंतर काही भागात मॉन्सूनची प्रगती झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तसेच, पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बंगालच्या उपसागरातही खाडीपर्यंत मॉन्सूनची प्रगती झाली आहे. 

Video : मॉन्सून कर्नाटकात दाखल; महाराष्ट्रात कधी पोचणार?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱयांनी (मॉन्सून) गुरुवारी कर्नाटकातील कारवारपर्यंत पोचले असल्याचे हवामान खात्याने सांगितले. मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

- प्रदूषण घटले असले तरी `याचा` धोका मात्र कायम...

मॉन्सून यंदा केरळमध्ये वेळेवर म्हणजे बरोबर 1 जूनला दाखल झालेला झाला. अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि त्याचे नंतर निसर्ग चक्रिवादळात झालेले रुपांतर यामुळे त्याच्या प्रवासाचा वेग वाढला. मॉन्सूनने सोमवारपर्यंत (ता. 1) कन्याकुमारी, केरळमधील कन्नुर, तामिळनाडूमधील कोईंबतूरपर्यंतचा भाग व्यापला. याच दरम्यान अरबी समुद्रात निसर्ग चक्रीवादळ घोंघाऊ लागले. हे चक्रावादळ उत्तरे सरकत असल्याने मॉन्सूनच्या प्रवासाचा पोषक वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपि यांनी सांगितले. 

- नोकरी धंदा करण्याच्या वयात तरुणांची गुन्हेगारीत एंट्री; पुण्यात 12 दिवसात 7
खून...


निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला समांतर घोंगावत पुढे गेले. ते अलिबागजवळ जमिनला धडकले. त्यानंतर काही भागात मॉन्सूनची प्रगती झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तसेच, पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बंगालच्या उपसागरातही खाडीपर्यंत मॉन्सूनची प्रगती झाली आहे. 

- बारावीच्या विद्यार्थ्यांनो, फिजिक्स विषयाचा नवीन अभ्यासक्रम कसा आहे? जाणून घ्या

पुढील वाटचालीसाठी मॉन्सून सज्ज
मॉन्सून पुढील वाटचालीसाठी सज्ज आहे. विशेषतः मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, तमिळनाडू, पॉडेंचेरी येथे येथून पुढे मॉन्सून पुढे सरकेल. मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महाराष्ट्रात मॉन्सून कधी पोचणार?
हवामान खात्याने दिलेल्या नविन तारखेनुसार राज्यात मॉन्सून पोचण्याची सर्वसाधारण तारिख आता 8 जून आहे. या तारखेला गोवा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी येथे मॉन्सून पोचेल. त्यानंतर सहा दिवसांमध्ये म्हणजे 14 जूनपर्यंत मॉन्सून पूर्ण राज्य व्यापून पुढचा प्रवास करण्याची सरासरी तारिख निश्चित केली आहे. या वर्षी कर्नाटकात मॉन्सून कशा प्रकारे वाटचाल करतो, याचा अंदाज घेऊन राज्यात मॉन्सून कधी पोचेल, याची निश्चित माहिती देता येईल, असेही डॉ. काश्यपि यांनी सांगितले.