Katraj Ghat : गर्द हिरवाईने नटला कात्रज घाट, सततच्या पावसामुळे चित्र बदलले; पर्यटकांच्या वर्दळीत वाढ
Monsoon Vibes : पावसामुळे सजलेला कात्रज घाट सध्या पर्यटकांना निसर्गसंपन्न अनुभव देत आहे, हिरवळ, धुके, मोरांचा कल्लोळ यामुळे घाट परिसर पुन्हा एकदा जीवंत झाला आहे.
कात्रज : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कात्रज घाट परिसरात निसर्गसौंदर्य फुलून आले आहे. डोंगराळ भागावर चहूबाजूंनी पसरलेली हिरवाई, वाहणारे ओहोळ आणि थंड हवामान यामुळे कात्रज घाटाने जणू हिरवा शालूच पांघरला आहे.