
Monsoon Update
Sakal
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आज मॉन्सूनने पश्चिम राजस्थानमधून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. गेली काही वर्षे उशिराने माघारी फिरणाऱ्या मॉन्सूनने यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू केला आहे. मॉन्सूनने यंदा तब्बल दोन महिने १६ दिवस राजस्थानमध्ये मुक्काम केला.