

Mist, Waterfalls and Green Valleys: Andar Maval Witnesses Massive Tourist Rush
sakal
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील आंदर मावळ परिसर पावसाळ्याच्या आगमनानंतर पुन्हा एकदा निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा निसर्गरम्य परिसर हिरवाईने नटला असून धुक्याची दुलई, डोंगरकपाऱ्यांतून कोसळणारे असंख्य धबधबे, ओसंडून वाहणारे ओढे-नाले आणि पाण्याने तुडुंब भरलेली धरणे यामुळे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंदर मावळाचे सौंदर्य खुलले आहे. परिणामी शनिवार-रविवार तसेच सार्वजनिक सुट्यांमध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नाशिकसह राज्याच्या विविध भागांतून हजारो पर्यटक येथे दाखल होत आहेत.