Weather Update
esakal
महाराष्ट्रातून मॉन्सूनचा मुक्काम संपला असून परतीला वेग आला आहे.
दक्षिण विदर्भाचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात माघार
शेतकऱ्यांसाठी पुढील पेरणी आणि कापणी हंगामाचा अंदाज अनुकूल
पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला (Monsoon Withdrawal) चांगलाच वेग आला आहे. दक्षिण विदर्भाचा काही भाग वगळता आज बहुतांश महाराष्ट्रातून मॉन्सूनने (Maharashtra Weather) माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. परतीसाठी पोषक हवामान असल्याने लवकरच मॉन्सून देशाचा निरोप घेण्याची शक्यता आहे.