Weather
sakal
पुणे - जूनमध्ये झालेल्या अपुऱ्या पावसानंतर आता जुलैमध्येही देशात आणि राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. जुलैच्या सुरुवातीला मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता असली, तरी पुढे पावसातील संभाव्य खंडांमुळे या महिन्याचा पाऊस सरासरीखाली राहू शकतो, असे ‘आयएमडी’चे म्हणणे आहे. जूनमध्ये देशभरात महिन्याच्या सरासरीपेक्षा ३९.८ टक्के; तर राज्यात ५० टक्के कमी पाऊस झाल्याची आकडेवारी ‘आयएमडी’ने जाहीर केली.