उरुळी कांचनमध्ये महिनाभर नवीन मुठा कालव्यातील पाणी फक्त पिण्यासाठीच

जनार्दन दांडगे
शनिवार, 11 मे 2019

उरुळी कांचन (पुणे ): उरुळी कांचन व उरुळी कांचन पंचक्रोषीतील नागरिकांना पुढील महिनाभर पुरेशे पिण्याचे मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने पाण्याचा साठा नवीन मुठा कालव्यात केला आहे. कालव्यात अडविण्यात आले पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याचे बंधन पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतीवर घातले आहे.

उरुळी कांचन (पुणे ): उरुळी कांचन व उरुळी कांचन पंचक्रोषीतील नागरिकांना पुढील महिनाभर पुरेशे पिण्याचे मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने पाण्याचा साठा नवीन मुठा कालव्यात केला आहे. कालव्यात अडविण्यात आले पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याचे बंधन पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतीवर घातले आहे. यामुळे कालव्यातील पाणी शेतकऱ्यांनी पाणी वापरु नये. शेतकऱ्यांनी कालव्यातील पाणी वीजपंप अथवा डिझेल पंप किंवा सायपण पद्धतीने उचलण्याचा प्रयत्न केल्यास, पाणी उचलणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा उरुळी कांचनच्या सरपंच राजश्री वनारसे व उपसरपंच संतोष कांचन यांनी दिला आहे. 

उरुळी कांचन व पंचक्रोशीतील तरडे,वळती, शिंदवणे आदी गावांच्या पाणी पुरवठा योजना या नवीन मुठा कालव्यावर पुर्णपणे अंवलबुन आहेत. पाठबंधारे विभागाने कालव्यातुन पाणी सोडण्यास बंद करताच, वरील चारही गावांना पाणी टंचाईला सामोरी जावे लागते. आहेत. पाठबंधारे विभागाने कालव्यातुन पाणी सोडणे शुक्रवार (ता. 10) बंद केले आहे. यामुळे पुढील महिनाभर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने उरुळी कांचन ग्रांमपंचायतीने शिंदवणे गावाच्या हद्दीतील जेजुरी रस्त्यावरील  काळेशीवार या ठिकाणी असलेल्या मुठा उजवा कालवा पुलाजवळ असलेले गेट बंद करून नव्या कालव्यात पाणी अडविले आहे. यासाठी ग्रामपंचायतीने शासनाने विशेष परवानगीही घेतलेली आहे. पुढील महिनाभर दुष्काळाची तीव्रता आणि उष्णतेची लाट या दोन्ही गोष्टींच्या पार्श्वभूमीवर केवळ या भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी उपयोग व्हावा यासाठी, कालव्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांनी वीजपंप वा डिझेल पंप किंवा सायपण पद्धतीने उचलून वापरू नये असे आवाहन सरपंच राजश्री वनारसे व उपसरपंच संतोष कांचन यांनी 

याबाबत अधिक माहीती देताना सरपंच राजश्री वनारसे म्हणाल्या, ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा हा पुर्णपणे नवीन मुठा कालव्यावर अंवलबुन आहे. पाटबंधारे विभागाने कालव्यातुन पाणी सोडणे बंद केल्याने, पुढील महिनाभर पाणी पुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायतीने पाण्याचा साठा नवीन मुठा कालव्यात केला आहे. खडकवासला धरण साखळीत चालु वर्षी पाणी साठा मर्यादीत असल्याने, यापुढील काळात कालव्यात पाणी सोडण्यात येणार का याबाबत नक्की सांगता येणार अशी भुमिका पाटबंधारे खात्याने घेतली आहे. यामुळे कालव्यात साठवलेले पाणीच पुढील महिनाभर वापरावे लागणार आहे. कालव्यातील पाणी शेतकरी चोरुन वापरतात अशा ग्रामपंचायतीचा यापुर्वीचा अनुभव आहे. यामुळेच शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याचा वापर करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पाणी चोरुन वापरण्याचा प्रयत्न केल्यास, खडकवासला कालवा विभाग, पोलीस यंत्रणा आणि महावितरण यांच्या संयुक्त सहकार्याने पाणी चोरी करणाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्यास ग्रामपंचायत मागेपुढे पहाणार नाही असेही वनारसे यांनी यावेळी स्पष्ठ केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For a month the new canal water is used to drink only in Urali kanchan