
स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला शिवविचार समजतील
बालेवाडी : बालेवाडी गावठाण येथे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) भोसले यांच्या जयंती दिनानिमित्त बालेवाडी चौक सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन (Bhumi Pujan) समारंभ सोहळ्या दरम्यान ते बोलत होते. या कार्यक्रमा चे आयोजन नगरसेवक अमोल बालडकर यांनी केले.
बालेवाडी चौक सुशोभीकरण हा भूमिपूजन सोहळा खासदार युवराज संभाजी छत्रपती (Sambhaji Raje Bhosle) यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी बोलताना युवराज संभाजी यांनी शहाजी राजे यांच्या बद्दल लोकांना जास्त माहिती नसल्याची खंत व्यक्त केली. शहाजीराजाची दूरदृष्टी, जिजाऊचे परिश्रम यामुळे शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करू शकले.
हेही वाचा: नवीन विद्यापीठ विधेयक मागे घ्यावे यासाठी युवा मोर्चा युवती विभागाचा निषेध
या ठिकाणी स्वराज्य संकल्पक शहाजी राजे, राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज या तीन आराध्य देवतांचे एकत्रित स्मारक उभारणे व त्याचे भूमिपूजन माझ्या हस्ते होणे हा माझ्यासाठी ही ऐतिहासिक, अविस्मरणीय असा क्षण असल्याचे त्यानी सांगितले. फक्त स्मारक न उभरता या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला त्यांचे विचार समजू दया, ते तिथे लिहा असा सल्लाही त्यानी दिला.
तर नगरसेवक अमोल बालवडकर यांनी माझ्याकडून महाराष्ट्राचे या तीन आराध्य देवतांचे स्मारक उभे रहाणार आहे हे माझ्या आयुष्यातील एकमेव मोठे काम असणार आहे, हा विचार माझ्या मनात आला हे मी माझे भाग्य समजतो असे विचार मांडले.
हेही वाचा: वर्धा : अवैध गर्भपात प्रकरणात पती झाला सहआरोपी
या प्रसंगी शिवकालीन मर्दानी खेळ, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, पोवाडा तसेच शस्त्र हाताळण्याची संधी समस्त बालेवाडीकरांना मिळाली. या प्रसंगी ह. भ. प. चंद्रकांत वांजळे, ह. भ. प. शेखर जांभुळकर, प्रकाश बालवडकर, स्वाभिमानी संघटनेचे प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे,नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेवक ज्योती कळमकर , लहू बालवडकर, हिंजवडीचे माजी सरपंच विक्रम साखरे, गणेश कळमकर, प्रह्लाद सायकर, इतर मान्यवर उपस्थित होते.
Web Title: Monument Through New Generation Understood Shivavichar Sambhaji Raje Bhosle
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..