वर्धा : अवैध गर्भपात प्रकरणात पती झाला सहआरोपी

डॉ. रेखा यांच्या मेडिकल कौन्सिलकडील नोंदीबाबत शंका
 abortion
abortion sakal

आर्वी : येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात (abortion)प्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉ. रेखा कदम (Dr. Rekha Kadam)यांचे पती डॉ. नीरज कदम (Dr. Neeraj kadam) यांनाही पोलिसांनी सहआरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. त्यांना मंगळवार (ता. १८) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिस आणि आरोग्य विभागाच्या चौकशीत या (Department of Health)रुग्णालयात अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या आहेत. एवढेच नव्हे तर डॉ. रेखा कदम यांची मेडिकल कौन्सिलकडे नोंद नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. नोंदणी नसतानाही त्या गेल्या दहा वर्षांपासून स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून रुग्णांवर उपचार करीत होत्या. यामुळे डॉ. रेखा कदम यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता बळावली आहे.

 abortion
कुरुंदा येथे 'कोरोना' वाढल्याने आजपासून तीन दिवसाचा लॉकडाऊन

राजकीय पार्श्वभूमी

कदम परिवाराला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. डॉ. नीरज कदम यांचे वडील डॉ. कुमारसिंह कदम हे सन १९८७ ते २००६ पर्यंत द महाराष्ट्र स्टेट हाउसिंग कार्पोरेशन लिमिटेड या शिखर संस्थेचे संचालक होते. तर सन १९८९ मध्ये ते एक वर्ष संस्थेचे अध्यक्ष होते. याशिवाय डॉ. कुमारसिंह कदम यांचे वडील जगजीवनराम हे १९७१ मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी तीन वेळा निवडून आलेले उद्योगपती कमलनयन बजाज यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.(Wardha Crime News)

 abortion
मुंबई : कृषी पर्यटन धोरणात लवकरच नवीन सुधारणा

सासू-सासरे नागपुरात

डॉ. रेखा कदम यांच्या सासू डॉ. शैलजा कदम व सासरे डॉ. कुमारसिंह कदम हे त्यांच्यावरील उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावरसुद्धा अटकेची टांगती तलवार असून पोलिसांचे त्यांच्यावर लक्ष आहे.

पतीकडून माहितीची अपेक्षा

तेरा वर्षांच्या मुलीच्या गर्भपात प्रकरणात पत्नी डॉ. रेखा कदम यांच्यासह पती डॉ. नीरज कदम यांनासुद्धा सह आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. त्यांना रविवारी विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. यात त्यांच्याकडून आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.(Vidarbha news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com