

Employees to Receive ₹13 Crore PF Following Regional Fund Commissioner’s Directive
sakal
पुणे : कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) संदर्भातील मोठा गैरप्रकार उघड करत प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी ‘मूळचंद’च्या दोन आस्थापनांना १३ कोटी ४८ लाख ५६ हजार १७ रुपये भरण्याचा आदेश दिला आहे. प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी हा निकाल दिला. ‘मूळचंद’च्या सुमारे नऊ हजार कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात हे पैसे जमा होणार आहेत.