Corona Updates: पुण्यातील कोरोनामुक्तांनी ओलांडला दीड लाखाचा टप्पा!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

पुणे जिल्ह्यातील गुरुवार अखेरपर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख २२ हजार १०५ झाली आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.२९) दिवसभरात ७०७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील २८८ जण आहेत. दरम्यान, दिवसभरात ६ हजार ११३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 

गुरुवारी १ हजार दोन कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय ३० जणांचा मृत्यू
झाला आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये १७३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १८०,
नगरपालिका क्षेत्रात ४७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ४ नवे रुग्ण सापडले आहेत.

पुणे : छाप्यावेळी हाती आलं घबाड; बड्या राजकीय व्यक्तीशी संबंधित कागदपत्रे पोलिसांच्या हाती​

दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १५ जण आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील ३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १० आणि नगरपालिका
क्षेत्रातील २ जणांचा मृत्यू झाला आहे. आज कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची
संख्या ही बुधवारी (ता.२८) रात्री ९ वाजल्यापासून गुरुवारी (ता.२९) रात्री नऊ
वाजेपर्यंतची आहे.

यामुळे पुणे जिल्ह्यातील गुरुवार अखेरपर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख २२ हजार १०५ झाली आहे. यापैकी ३ लाख २ हजार ११८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ लाख ५० हजार ८२३ जण आहेत. याशिवाय आतापर्यंत ७ हजार ८२८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३६६ जणांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than 1 lakh 50 thousand peoples defeated corona in Pune city