एक कोटीहून जास्त गणेशक्तांनी 'दगडूशेठ गणपती'चे घेतले ऑनलाईन दर्शन!

Dagdusheth_Ganpati
Dagdusheth_Ganpati

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, याकरिता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे नागरिकांना घरबसल्या दर्शनाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. गणेशोत्सवादरम्यान सात दिवसात ट्रस्टचे संकेतस्थळ, फेसबुक, यू- ट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटरसह सोशल मीडियावर तब्बल एक कोटी २७ लाख ८७ हजार गणेशभक्तांनी भेट देत 'बाप्पां'चे दर्शन घेतले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचे यंदाचे हे १२८ वे वर्ष आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले. त्यावेळेपासून ट्रस्टच्या संकेतस्थळावरुन दररोज तब्बल दोन लाख पाच हजार ८३३ हून अधिक भाविक 'बाप्पां'चे दर्शन घेत आहेत. या संकेतस्थळाद्वारे दररोज सकाळी आणि रात्री होणारी लाईव्ह आरती देखील हजारो गणेशभक्त पहात आहेत. तर, सुमारे ९५ लाख भाविक फेसबुकवरुन, इन्स्टाग्रामवर सहा लाख ३२ हजार, यू ट्यूबवर २४ लाख आणि अ‍ॅपवरुन ५० हजार गणेशभक्तांनी बाप्पांचे दर्शन घेतले आहे. यामुळे यंदाच्या गणेशोत्सव काळात शुक्रवारपर्यंत तब्बल एक कोटी २७ लाख ८७ हजारहून अधिक गणेशभक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेतला आहे. ऑनलाईन अभिषेकाची नोंदणी यासुविधेचाही लाभ अनेक भक्त घेत आहेत.

जगाच्या काना-कोपऱ्यातून भाविक घेतायेत 'बाप्पा'चे दर्शन
- देशातंर्गत ठिकाणे : मुंबई, हैदराबाद, बंगळुरु, इंदोर, नागपूर, जयपूर, दिल्ली, चेन्नई, ठाणे, नवी मुंबई, कलकत्ता, नाशिक, सूरत, वडोदरा आदी शहरांमधील भक्तांनी आतापर्यंत 'बाप्पांचे दर्शन घेतले आहे. 
-  अमेरिका, इंग्लंड, दुबई, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, जर्मनी, नेदरलँड, ओमान, बेल्जियम, न्यूझीलंड, जपान, थायलंड, कतार, आर्यलंड, कुवेत आदी देशांतील गणेशभक्तांनी दगडूशेठच्या 'श्रीं'चे ऑनलाइन दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या सोशल मीडियावर भेट दिली आहे. 

"उत्सवकाळात दगडूशेठ गणपती मंदिर बंद राहणार असल्याने मंडळाचे कार्यकर्ते देखील मंदिरात दर्शनासाठी जात नाहीत. त्यामुळे नागरिकांनी देखील मंदिराजवळ गर्दी करु नये. गणेशभक्तांना घराबाहेर न पडता घरच्या घरीच 'श्रीं'चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू-ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय उपलब्ध आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा,"
- अशोक गोडसे, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
 
तब्बल एक कोटीहून जास्त भाविकांनी घेतले ऑनलाईन दर्शन
- फेसबुक :  ९५,००,०००
- संकेतस्थळ : २,०५,८३३
- इन्स्टाग्राम : ६,३२,०००
- यू-टयूब : २४,००,०००
- अ‍ॅप : ५०,०००

'बाप्पा'च्या ऑनलाइन दर्शनासाठी आवश्यक लिंक :
- http://www.dagdushethganpati.com/
- http://bit.ly/Dagdusheth-Live
- http://bit.ly/Dagdusheth_iphone_App
- http://bit.ly/Dagdusheth_ Android_App 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com