esakal | सचेतला पाठ आहेत १०० हून अधिक देशांची नावे
sakal

बोलून बातमी शोधा

sachet patil

सचेतला पाठ आहेत १०० हून अधिक देशांची नावे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे: जगातल्या विविध देशांचे किंवा राज्यांच्या राजधानींची नावे तोंडपाठ करणे प्रत्येकालाच शक्य नाही. पण देशात अशीही काही मुले आहेत जी अशी अवघड कामे सहज करून जातात. असीच काहीशी किमया पुण्यातील नांदेड सिटी येथे राहणाऱ्या सहा वर्षांच्या सचेत प्रताप पाटीलने केली आहे. सचेतला १०० हून अधिक देशांची नावे पाठ असून तो देशाच्या आकारावरून त्यांची नावे सांगतो. त्यामुळे त्याच्या नावाची नोंद नुकतीच ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

हेही वाचा: पुणे : तेरा लाख मोफत शिवभोजन थाळ्यांचे वाटप

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी त्याने अवघ्या ५४ सेकंदात १०१ देशांची नावे त्यांच्या आकारावरून ओळखून दाखवली. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षणाचा वापर वाढल्याने विद्यार्थ्यांच्या हाती स्मार्टफोन आला आहे. या स्मार्टफोनचा योग्य वापर कसा करावा याची सचेतने जाणीव करून दिली आहे.

कारण ही सर्व माहिती त्याने मोबाइलद्वारे नेटवर सर्च करून पाठ केली आहे. ऑनलार्इन शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या देशांची नावे, त्यांच्या राजधान्या, झेंडे तेथील प्रसिद्ध स्थळे माहिती करून घेण्याचा छंद त्याला जडला. इतकंच नाही तर हे छंद जोपासत तो या सर्व गोष्टींची माहिती इंटरनेटवरून शोधून आपल्या वहिमध्ये त्याची नोंद करत होता.  

हेही वाचा: पुणे: गिरीश बापट यांनी घेतला विमान विस्तारीकरणासंदर्भात आढावा

सचेत याच्या कामगिरीबद्दल त्याचे वडील प्रताप पाटील यांनी सांगितले की,‘‘ सचेत मोबाईलवर दररोज नकाशे व इतर स्थळांचे व्हिडिओ बघायचा. त्याला इतक्या देशांची नावे पाठ आहेत व त्यांच्या आकारावरून तो देशांची नावे सांगू शकतो हे लक्षात आल्यावर आम्ही त्याचा व्हिडिओ इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी पाठविला. यासाठी त्याची मोठी बहीण आणि आम्ही त्याला मदत करते. मुलांना त्यांचा छंद व त्यांना आवडणाऱ्या गोष्टी पालकांनी करून दिल्या पाहिजेत.’’

‘‘मला मॅपोलॉजीची आवड आहे. म्हणून मी रोज मोबाईलवर व्हिडिओ बघून वेगवेगळ्या देशांची नावे पाठ करतो. माझ्या सर्व शिक्षक व मित्रांनी माझे अभिनंदन केले. त्यामुळे मला आणखीच आनंद झाला. मला अजून अशाच प्रकारे वेगवेगळे रेकॉर्ड्स करायचे आहेत.’’- सचेत पाटील

‘‘सध्या अनेक मुले मोबार्इलचा वापर आॅनलार्इन शिक्षणा व्यतिरीक्त केवळ केवळ मनोरंजनासाठी करीत असल्याचे दिसते. पालकांनी आपल्या मुलांच्या छंदांना ओळखून त्यातून मुलांना काही नवीन शिकता येईल या अनुषंगाने मोबाईलचा वापर करायला शिकविणे गरजेचे आहे. तसेच मुलांकडूनही आपल्याला खूप काही नवीन गोष्टी शिकता येतात.’’- सुचित्रा पाटील, सचेतची आई

loading image
go to top