

मोरगाव, ता. १० : मोरगावात ग्रामीण भागातील नागरिकांचे विविध प्रश्न कमी वेळेत मार्गी लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान मंगळवारी (ता.१२) होणार आहे.
मोरगाव - पळशी रोडवर सिद्धी विनायक मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. मोरगाव मंडल मधील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान जिल्हा परिषद सदस्य रोहिणी कदम -ढोले यांनी केले आहे.
७/१२, ८अ दुरुस्ती, फेरफार, मोजणी डिजिटल सातबारा, अँग्री स्टॅक योजना, आधार कार्ड अपडेट करणे दुरुस्त करणे, लक्ष्मी मुक्ती योजना, शिधापत्रिका काढणे, स्वजन गणना आदी कामे शिबिरात होणार आहेत, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन महसूल विभागाकडूनही केले आहे.
मोरगाव, तरडोली, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, जोगवडी, मूर्टी, मोराळवाडी, मोढवे, उंबरवाडी, बाबुर्डी, शेरेवाडी परिसरातील नागरिकांना या अभियानाचा लाभ घेता येणार आहे.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.